राज्यातील इ.१० वी ते १२ वी तील विद्यार्थ्यासाठी दि.१४ जून,२०२१ पासून डी.डी.सह्यांद्री वाहिनीवर "ज्ञानगंगा" या शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.विध्यार्थानी या वेबसाईट वरील दूरदर्शन डी.डी.सह्यांद्री च्या लोगोला टिचकी मारून पाहू शकता कोणतेही ऐप वापरण्याची आवश्यकता नाही.
कार्यक्रम LIVE पाहण्यासाठी खालील Logo / लिंकवर क्लिक करा
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यातर्फे ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमा अंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यासाठी डी डी सह्याद्री वाहिनी द्वारे शैक्षणिक तासीका त्यांच्या प्रक्षेपण या बाबत
राज्यामध्ये कोरोणाच्या वाढत्या संसर्गामुळे कोरोना जागतिक महामारी म्हणून घोषित केले असल्याने राज्यातील या असाधारण आपत्कालीन परिस्थिती मुळे राज्यांमध्ये विविध निर्बंध लागू करण्यात आले आहे त्यामुळे राज्यातील शाळा बंद असल्याने या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी डी डी सह्याद्री वाहिनीवरून दिनांक १४ जून २०२१ पासून सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये दैनिक पाच तास म्हणजे तीनशे मिनिटे इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे सदरचे प्रक्षेपण सोमवार ते शुक्रवार सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन या वेळेत डीडी सह्याद्री वाहिनीच्या काही नियोजित बातम्यांची वेळ वगळता प्रक्षेपित केले जाणार आहेत प्रथम टप्प्यांमध्ये इयत्ता दहावी मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम तसेच इयत्ता बारावीच्या तीनही शाखांच्या शैक्षणिक तसेच त्यांचे प्रक्षेपण सुरू करण्यात येत आहे उर्वरित इयत्तांच्या तासिकांचे प्रक्षेपण देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे सदरच्या शैक्षणिक कार्यक्रमाच्या दैनिक प्रसारणाचे सविस्तर वेळापत्रक खालिल प्रमाणे आहे
ConversionConversion EmoticonEmoticon